महारक्तदान शिबिरात ५०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान, रक्तदात्यांचा 10 लाखांचा अपघात विमा.. भिवंडी:दि.01 सप्टेंबर

महारक्तदान शिबिरात ५०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान, रक्तदात्यांचा 10 लाखांचा अपघात विमा.. भिवंडी:दि.01 सप्टेंबर [ वार्ताहर ] भिवंडी शहरात एकात्मतेचा राजा म्हणून गौरवल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून हा उत्सव फक्त धार्मिक सोहळा न राहता सामाजिक उपक्रम राबवणारा गणेशोत्सव म्हणून ओळखला जात आहे.धामणकर नाका मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या संकल्पनेतून मागील सहा वर्षांपासून गणेशोत्सव दरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.यंदा मुंबादेवी ब्लड अँड थेलेसिमिया डे केयर सेंटर यांच्या सहकार्याने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रात भारतीय सैन्य दलातील सैनिक तसेच माजी सैनिकांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराचा शुभारंभ संतोष शेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी हसमुख पटेल,दिलीप पोद्दार,मोहन बल्लेवार,आयोजन समितीचे राकेश पटवारी,चंद्रकांत हेगडे ,भिवंडी वॉरियर्स ग्रुपचे फुलसिंग सोळंकी, सुरज भागवत व त्यांचे सैनिक सहकारी उपस्थित होते. सायंकाळपर्यंत सुरू राहिलेल्या या रक्तदान शिबिरात ५०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.विशेष बाब म्हणजे या सर्व रक्तदात्यांना धामणकर नाका मित्र मंडळाच्या वतीने भारतीय पोस्ट विभागाकडील दहा लाख रुपयांचा अपघात विमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला ज्यामध्ये महिलांचा सुद्धा मोठा सहभाग होता.शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचत नाहीत.या रक्तदान शिबिरातून मंडळाने रक्तदात्यांचा अपघात विमा उतरवताना त्यांचे पोस्ट खात्यात बँक खाते सुद्धा या माध्यमातून उघडण्यात आले आहे.ज्यामुळे यापुढे रक्तदात्यांना भविष्यात बचतीची सुद्धा सवय लागणार आहे अशी प्रतिक्रिया संतोष शेट्टी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!